नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – कर्मचारी भविष्य निधी संघटन म्हणजेच पीएफमध्ये 100 कोटी रुपयांहून अधिकचा गैरव्यवहार समोर आला होता. ईपीएफओने आतापर्यंत 11 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. 8 अधिकाऱ्यांना आधीच निलंबित करण्यात आले होते. मुंबई रिजनच्या कार्यालयातील कर्मचारी निलंबित केले आहेत.
एक मुख्य अधिकारी असलेला आरोपी फरार आहे. सामान्यांच्या भविष्य निधीशी संबधित घोटाळा सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. तपास सुरू आहे. तपासादरम्यान 100 कोटींचा घोटाळा असल्याची बाब समोर आली आहे.
लॉकडाऊन काळात लोकांना दिलासा देण्याच्या उद्देशाना पीएफ खात्याने पैसे काढण्याच्या नियमांमध्ये शिथिलता दिली होती. ज्याचा फायदा अधिकाऱ्यांनी घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
उत्पन्न कमी होणे किंवा नोकरी गेल्यामुळे असंख्य लोकांनी पीएफमधून पैसे काढण्यासाठी अर्ज केला होता.परंतु त्याचे सेटलमेंट करणे गरजेचे असते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या लॉगिन आणि पासवर्ड दुसऱ्या अधिकाऱ्यांसोबत शेअर केले. ज्यामुळे कमी वेळात जास्तीत जास्त सेटलमेंट होऊ शकतील. काही कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी याचा गैरफायदा घेत अनेक खात्यांमधून पैसे गायब केले. असल्याची माहिती मिळत आहे.