चाळीसगाव ;- तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र लोंढे अंतर्गत येणारे सर्व गावात जे किरकोळ आजाराचे पेशंट असतात अशा लोकांना लोंढे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात येण्यासाठी,लाॅकडाऊन मुळे प्रवाशी वाहतूक बंद असल्याने जिकिरीचे होते .किंवा जे वृध्द, गरीब ज्यांचे वैक्तीक खाजगी वाहन नाहीत .अशा लोकांना दवाखान्यात येताच येत नाही.व अशा रूग्णाचे उपचाराअभावी हाल होता आहेत. म्हणूनच अशा लोकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र लोंढेचे वैद्यकीय अधिकारी डाॅ संदीप निकम यांनी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ डी.के.लांडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅक्टर आपल्या गावात हा उपक्रम सुरू केला.
.
आज ह्या उपक्रमात दरेगाव, पिंपळवाडी, आणि कृष्णापूरी येथे जाऊन रूग्ण तपासणी करून औषधोपचार केले
यासाठी सरपंच प्रशांत महाजन , गिरीश पाटील, रूपेश जाधव ,यानी सहकार्य केलेयावेळी आरोग्य कर्मचारी आर.एस.चव्हाण, देवराम महाजन,श्रीमती बकाल ,श्रीमती सोनार, हेमन्त भोईटे, अमोल पिलोरे, अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका हजर होते . औषधोपचार वैद्यकीय अधिकारी डाॅ संदीप निकम आणि डाॅ. संदीप चव्हाण यांनी केले.