रावेर ( प्रतिनिधी ) – रावेर तालुक्यात मूसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पुर आले आहे. जूना सावदारोडवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने काही काळ वाहतूक बंद करण्यात आली आहे.
रावेर शहरासह तालुक्यात तूफान पाऊस सुरु आहे. नदी-नाल्यांना पुर आहे. .जूना सावदारोडच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद झाली आहे. या पावसामुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.