पारोळा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील करंजी येथील कापूस वेचणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून रोख रक्कम व दागिने असा एकूण सव्वा लाखाचा ऐवज चोरून नेला पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला .
शांताराम लक्ष्मण पाटील हा शेतकरी कुटुंबीयांसह आज सकाळी शेतातील कापूस वेचणीसाठी गेला होता. मुलगा शाळेत गेला होता. सकाळी दहा वाजता मुलगा शाळेतून घरी परतला व तोदेखील घराला कुलूप लावून खिडकीत चावी ठेवून शेतात गेला . तो पुन्हा घरी आला.तेंव्हा त्याला दरवाजा उघडा दिसला व घरातील सामान , कपडे , साहित्य अस्ताव्यस्त दिसून आले. त्याने वडिलांना माहिती दिली घरी पोहोचल्यानंतर त्यांनी गोदरेज कपाटकडे धाव घेतली. कपाटाचे लॉक तोडून अनोळखी चोरट्याने एक लाख 22 हजार 697 रुपये किमतीचे दागिने व दोन हजार रुपये रोख असा जवळपास सव्वा लाखाचा ऐवज चोरून नेल्याचे निदर्शनास आले पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास एपीआय रवींद्र बागुल करीत आहेत.