जळगाव ( प्रतिनिधी ) – मु.जे. महाविद्यालयाजवळ दोन तरूणांनी एकमेकांना रागाने बघितल्याच्या कारणावरून बेदम मारहाण आणि चाकूने वार केल्याची घटना काल दुपारी घडली. रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सारंग डिगंबर कोळी (वय-१८ , रा. स्टेट बँक कॉलनी महाबळ ) हा तरूण मु.जे. महाविद्यालयासमोर पायल टी सेंटर येथे काल दुपारी बसलेला असतांना गोलू उर्फ स्वप्निल ठाकूर (रा. तुकाराम वाडी ) यांच्यासह इतर दोघे यांनी एकमेकांना रागाने बघितल्याच्या कारणावरून शिवीगाळ व मारहाण केली. गोलू ठाकूर याने चाकू मारून सारंग कोळी याला जखमी केले. सारंग कोळी यांच्या फिर्यादीवरून गोलू ठाकूर याच्यासह इतर दोन अनोळखी व्यक्तीविरोधात रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो ना विनोद सोनवणे करीत आहेत.