यावल ( प्रतिनिधी ) – बामणोद शिवारात काल मध्यरात्री बैलगाडीसह विहिरीत पडल्याने शेतमजूर आणि बैलाचा बुडून मृत्यू झाला फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विश्वनाथ रामसिंग सोनवणे (वय-६५ , रा. हातेड ता. चोपडा ह.मु. बामणोद ता. यावल ) असे मयत झालेल्या मजूराचे नाव आहे. विश्वनाथ सोनवणे हे सुरेश टिकाराम भंगाळे (रा. बामणोद) यांच्या शेतात कामानिमित्ताने १४ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजता बैलगाडीने गेले होते. रात्रीच्या वेळी शेतात बैलगाडीने जात असतांना विहिर न दिसल्यामुळे बैलगाडीसह ते पाण्यात पडले. एक बैल आणि विश्वनाथ सोनवणे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हा प्रकार सकाळी ८ वाजेच्या सुमारास लोकांच्या लक्षात आला. सुरेश भंगाळे यांच्या खबरीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास पो ना सुधाकर पाटील करीत आहेत