लाखोंची रोकड घेऊन सहा चोरट्यांनी धुमस्टाईलने लंपास केली
धुळे दी.19 एप्रिल :- देशात लॉक डाऊन परिस्थिती असताना धुळ्यातील दोघे चुलतभाऊ व्यापारी बंधुना साक्री निजामपूर रस्त्यावर रायपूरबारी घाटात दोन मोटरसायकल वरील सहा चोरट्यांनी धारधार शस्त्राचा धाक दाखवून 2 लाख 73 हजाराची रोकड चोरट्यांनी धुम स्टाइलने लंपास केली.
याबाबत मिळालेली माहिती की, लॉक डाऊन दरम्यान रायपूर बारी घाटात झालेल्या लुटीची वार्ता जिल्ह्यात वाऱ्या सारखी पसरली.
या लुटी प्रकारामुळे व्यापारी वर्गात भितीचे वातावरण आहे.
जिल्ह्यात आज दोन रस्ता लुटीच्या घटना घडल्याने नागरीकांत भितीचे वातावरण आहे.
धुळ्यातील ग.न.4 मधील रविंद्र ट्रेडर्स किरणा भुसार व्यापारी अमोल भोकरे व पंकज भोकरे
दोघे चुलत भाऊ मोटरसायकल क्रं.एम एच 18 एई 1147 ने धुळ्याहुन हे ग्रामिण भागातील किराणा दुकानातील मालाचे व्यापारी कडे पैसे वसूली साठी गेले होते.प्रथम साक्री येथील काही किराणा दुकान मालकाकडून दिलेल्या मालाची रोख रक्कम घेऊन ते साक्रीहुन निजामपूरला गेले.निजापूर गावातील 25 ते 30 किराणा दुकान मालकाकडून विकलेल्या मालाची रोख रक्कम त्यांनी जमा केली.त्या दोघांजवळ बॅगेत एकुण 2,73,000 रुपयांची रोकड जमा झाली होती.ती रोकड परत मोटरसायकल ने दुपारच्या वेळी ती दोघे भावंडे मोटरसायकल ने धुळ्याकडे येत असताना निजामपूर साक्री रस्त्यावर रायपूरबारी घाटात पाठिमागून दोन काळ्यारंगाच्या मोटरसायकल वर सहा जण टि शर्ट,जिन्स पॅट घातलेले तोडाला पांढरा रुमाल बांधलेले अहिराणी भाषा बोलणारे पाठलाग करत आले.त्यातील एका मोटरसायकल स्वाराने चटकन दोघे भावंडांच्या मोटरसायकल ला समोर येऊन धडक दिली.दोघे व्यापारीना खाली पाडून हाताने मारहाण करून धारधार शस्त्राचा धाक दाखवून 2,73,000 लाखोंची रोकड भरलेली बॅग हिसकावून चोरटे धुम स्टाईल पसार झाले.
या लुटीमुळे व्यापारी वर्गात भितीचे वातावरण आहे.
दोघे व्यापारी भावांनी साक्री पोलीस ठाणे गाठत दोन मोटरसायकल वर ट्रिपल सिट आलेले सहा जणांविरुद्ध लाखोंची रोकड लुटून नेल्या प्रकरणी लेखी तक्रार दाखल केली आहे.
साक्री पोलीस स्टेशन ला दोन मोटरसायकल वरील सहा जणांविरुद्ध व्यापारी भावंडांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुढील तपास साक्री पोलीस करत आहे.