मुंबई ( प्रतिनिधी ) – अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान क्रूझवरील अमलीपदार्थ पार्टीच्या गुन्ह्यात सध्या अटकेत असून त्याला आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले आहे.
वकिलांकडून आर्यन खानला जामीन मिळावा यासाठी पुरेपूर प्रयत्न सुरु आहेत. आर्थर रोडमध्ये क्वारंटाइन बराकमध्ये असलेल्या आर्यन खानसमोर आता नवे आव्हान उभे राहिले आहे. कारण क्वारंटाइन कालावधी संपल्यामुळे इतर कैद्यांसोबत आर्यन खानला राहावे लागणार आहे.
नव्या कैद्यांना कोरोनामुळे जेलमध्ये आणल्यानंतर इतर कैद्यांसोबत ठेवले जात नाही इतर कैद्यांपासून लांब त्यांना क्वारंटाइन बराकमध्ये ठेवले जाते. त्यानुसार आर्यन खानसह इतरांनाही तिथे ठेवण्यात आले होते. दरम्यान आर्यन खानचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती कारागृह प्रशासनाने दिली आहे. यामुळे आता त्याला क्वारंटाइन बराकमधून इतर कैद्यांसोबत ठेवण्यात आले आहे.