नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) – दिल्लीत व्हॉट्सअॅपद्वारे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
गौतमबुद्ध नगर पोलिसांच्या एंटी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटनं ही कारवाई केली आहे. आरोपी व्हॉट्सअॅपद्वारे ऑन डिमांड सेक्स रॅकेट चालवत होता. पोलिसांनी घटनास्थळावरून चार मुलींनाही ताब्यात घेतलं आहे. पोलिसांचा दावा आहे की, आरोपी त्याच्या ग्राहकांच्या डिमांडनुसार मुली पुरवत होता. ग्राहक जिथे जिथे मुलींना फोन करुन बोलावयाचे, तिथे हा आरोपी मुलींना गाडीतून सोडायला जायचा. तर कधीकधी मुलींना कॅबनंही पाठवले जायचं.
आरोपी व्हॉट्सअॅप आणि इंटरनेटद्वारे ऑनलाईन बुकिंग करून सेक्स रॅकेटचा व्यवसाय चालवत होता. हे लोक ग्राहकांकडून एडवान्समध्ये ऑनलाईन पेमेंट घेतल्यानंतरच मुलींना त्यांच्याकडे पाठवायचे. पोलिसांनी आरोपींकडून एक कार आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत.
टोळीचा म्होरक्या सलमान नोएडाच्या सेक्टर 71 मधील स्क्वेअर मॉलजवळ राहत होता.उत्तर प्रदेशातील औरैयाचा रहिवासी आहे. सलमानला पोलीस स्टेशन सेक्टर -24 परिसरातील सारथी हॉटेल, सेक्टर 53 नोएडा येथून अटक केली आहे. ही टोळी इंटरनेट आणि व्हॉट्सअॅप क्रमांकाद्वारे लोकांशी बोलतात आणि जेव्हा डील होते, तेव्हा हे लोक मुलींना हॉटेल, घरं, वाहनांद्वारे ग्राहकांकडे पाठवतात. ही टोळी ग्राहकांकडून मोठी रक्कम गोळा करतात. बऱ्याचंदा रोख पैसे गोळा केले जातात. जवळपास 5,000 ते 20,000 रुपये ग्राहकांकडून घेतले जातात असे पोलिसांनी सांगितले .
या आरोपीला पकडण्यासाठी पोलीस स्वतः ग्राहक म्हणून गेले होते. ही टोळी मुलींचे ऑन-डिमांड फोटो व्हॉट्सअॅपवरच ग्राहकांना पाठवत असतात. मुलगी पसंत केल्यानंतर आणि सर्व काही झाल्यावर, आरोपी मुलीला त्याच्या कारमधून ग्राहकाच्या घरी किंवा हॉटेलवर घेऊन जातो. आरोपी सलमानवर विविध पोलीस ठाण्यात 10 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी आरोपीकडे असलेल्या 4 मुलीही ताब्यात घेतल्या. यात पश्चिम बंगालमधील दोन मुली, गाझियाबाद आणि दिल्लीच्या प्रत्येकी एका मुलीचा समावेश आहे. मुलींनी सांगितलं की, आरोपी त्यांना जबरदस्तीनं या सेक्स रॅकेटमध्ये आणत होते. आरोपींच्या टोळीत सामील असलेल्या इतर मुलींची सुटका करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.