पान सेंटरचे नुकसान ; चालक जखमी
जळगाव (प्रतिनिधी) – शिरसोली येथे बस स्टँडवरील लक्ष्मी पान सेंटर दुकानात कन्नडकडून जळगावकडे भाजीपाला घेऊन जाणारी भरधाव मालवाहू पिकप मध्य रात्री पान सेंटरला धडकली या वाहनाचा चालक जखमी झाला आहे. पान सेंटरचे नुकसान झाले. जळगाव एमआयडीसी पोलीसात नोद करण्यात आली आहे.
शिरसोली प्र.न. येथे बस स्टँडवरील पुना बारी याच्या मालकीचे लक्ष्मी पान सेंटर असुन या आधीही भरधाव वेगाने पाचोरा कडून जळगावकडे जाणारी ब्रेझा धडकली होती यात पान सेंटरचे नुकसान झाले. दुसऱ्यादा पाचोरा कडून जळगावकडे मकाची कणसे घेऊन जाणारी मंहिद्रा मालवाहतूक पिकअप लक्ष्मी पान सेंटरजवळ पलटी झाली. यात हे पान सेंटर थोडक्यात बचावले आज तिस-यांदा मध्यरात्री २ वाजता भरधाव वेगाने येणारी एम.एच.२० ई.एल.७५८१ क्रमांकाची मालवाहू पिक अप लक्ष्मी पान सेंटरला धडकली यात पान सेंटर जमीनदोस्त झाले आहे. याबाबत पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी एमआयडीसी पोलीसांना कळविले
गतीरोधकची नागरीकांची मागणी
शिरसोली बस स्टँडवरील चौकातून दररोज हजारो वाहने ये जा करतात या चौकात वळण असल्याने आणि नवीन रस्ता झाल्यामुळे याठिकाणी वाहन चालकाचा ताबा नियंत्रणात राहत नाही. याठिकाणी अनेक अपघात होतात. यामुळे गतीरोधक बसवावे अशी मागणी शिरसोली करांनी केली आहे.