जळगाव ( प्रतिनिधी )– कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामधील अनागोंदीच्या चौकशीला टाळाटाळ करण्याचे काम अधिकारी करत आहेत त्यासाठी वेळोवेळी तक्रार करूनही काही लोक अधिकाऱ्यांना हाताशी धरून जाणीवपूर्वक विद्यापीठात भ्रष्टाचार करत आहेत व विद्यापीठाची बदनामी करत आहेत, अशी तक्रार राज्यपालांकडे करण्यात आली आहे

अँड कुणाल पवार , भूषण भदाणे , गणेश निंबाळकर , गौरव वाणी , चेतन चौधरी यांनी राज्यपालांकडे दाखल केलेल्या तक्रारीत पुढे म्हटले आहे की , कुलगुरूनीं वेळेच्या आधी दबावाला कंटाळून पदाचा राजीनामा का दिला ? कर्मचारी यांचे गणवेश काम ,.बाग काम , साफसफाई ठेके , रद्दीसाठी टेण्डर न काढता मनमानी पद्धतीने कामे का दिली जातात ? .सुरक्षा रक्षकांचे भविष्य निर्वाह निधी , भत्ते , कपडे , बूट व सुट्ट्यांमध्ये दिलेले जाणारे वेतन असे संगनमत करून अडकवून ठेवलेले पैसे व त्यातून मलिदा खाणारे निर्लज्ज लोकांना अभय दिले जाते अशा लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे .
नियमबाह्य प्राध्यापक भरती , गुणवत्ता नसताना बढती , पी एच डी पदव्या आर्थिक हित पाहून दिलेल्या आहेत त्याची चौकशी होणे आवश्यक आहे . नवीन बांधकाम करताना दिलेले जाणारे टेण्डर एकच व्यक्तीला दिलेले गेले आहेत रस्ता डांबरीकरण कामदेखील वर्षानुवर्षे एकच ठेकेदार करत आहे त्याला कोणते अधिकारी अभय देतात ?
कोरोनामधे काम बंद असताना काही निवृत्त लोकाना विद्यापीठात बिले काढण्यासाठी बसवून विद्यापीठ विकास निधीचा गैरवापर झाला आहे. चौकशी समितीच्या निवृत्त न्यायाधीशांनी राजीनामा का दिला याचीही चौकशी व्हावी कायमस्वरूपी कुलसचिव नेमणूक का केली जात नाही ?
प्रा भटकर यानी विद्यार्थिनीसोबत केलेले संभाषण व विनयभंग याची तीन वर्ष होऊन देखील चौकशी नाही परंतु ही चौकशी करणारे दोन चौकशी अधिकारी यानी दिलेले राजीनामे याची चौकशी व्हावी विद्यापीठ कर्मचारी कृती समितीने अनागोंदीला कंटाळून काम बंद आंदोलन सुरु करीत प्रशासक नेमण्याची मागणी केली आहे.
आता भ्रष्टाचार घोटाळा करून किती निधी शिल्लक आहे याचा तपशील देखील सर्वाना संकेत स्थळांवर दिसत आहे म्हणून विद्यापीठात प्रशासक यांची नियुक्ती करून वातावरण पूर्व पदावर आणून विद्यापीठ वाचवावे असे आवाहन या निवेदनात राज्यपालांना करण्यात आले आहे .







