जळगाव ( प्रतिनिधी ) – लाल निशाण पक्षाचे ( लेनिनवादी ) राज्याचे अध्यक्ष कॉ सुभाष काकुस्ते यांच्यावर हल्ला करून धमकावणाऱ्या मोदी समर्थक गुंडांना अटक झाली पाहिजे या मागणीसाठी आज जिल्हाध्यक्ष कॉ विकास अळवणी यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आणि आंदोलन करण्यात आले

लाल निशाण पक्षाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , पक्षाचे राज्याचे अध्यक्ष कॉ सुभाष काकुस्ते चिकगुणियाने आजारी असल्याने पांझरा कांन कॉलोनीतील त्यांच्या घरी विश्रांती घेत होते ७ ऑक्टोबररोजी दुपारी ओळख लपवण्यासाठी चेहरा झाकून दोन मावल्यासारखे दिसणारे लोक त्यांच्या घरी आले आणि त्यांनी काकुस्ते यांना मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधातील शेताकारी आंदोलनात सहभागी होऊ नका लोकांना भडकावू नका अन्यथा परिणाम वाईट होतील जीव गमवावा लागेल अशी धमकी देत धक्काबुक्की केली होती त्यानंतर कॉ सुभाष काकुस्ते यांनी साक्री पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करूनही अद्याप प्लॉईस या गुंडांना पकडू शकले नाहीत सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे कॉ किशोर ढमाले यांचाही पत्ता हे गुंड कॉ काकुस्ते यांना विचारत होते . साधारण गुंड असे धाडस करू शकणार नाहीत त्यांना राजकीय आशीर्वाद असावा असा आरोपही लाल निशाण पक्षाने केला आहे
या निवेदनावर लाल निशाण पक्षाचे ( लेनिनवादी ) जिल्हाध्यक्ष कॉ विकास अळवणी , संघटक कॉ वैशाली आळवणी व कॉ कविता सपकाळे आदींच्या सह्या आहेत या आरोपींच्या अटकेसाठी आज राज्यभर लाल निशाण पक्ष आंदोलन आणि निदर्शने करीत आहे







