जळगाव ( प्रतिनिधी ) – शिरसोली येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मणियार विधी महाविद्यालय आणि डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयातर्फे बारी समाज माध्यमिक विद्यालयात कायदेविषयक जागृती व मार्गदर्शन शिबीर काल झाले . त्याआधी बेटी बचाव बेटी पढाव जनजागृती रॅली काढण्यात आली.

सुरूवातीला डॉ. नयना झोपे यांनी स्त्री भ्रुण हत्या, बेटी बचाव संदर्भात कायद्याची माहिती दिली . जिल्हा विधी प्राधिकरणाचे सहाय्यक आरीफ पटेल यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. यात लोकन्यायालयाचे आयोजन करणे, कारागृहातील पुरुष व महिला कैद्यांना मोफत कायदेशीर मदत, बालगुन्हेगार मध्यस्थ केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना , महिलांचे विविध कायदेशीर अधिकार कामाच्या ठिकाणी आर्थिक शोषण , गर्भलिंगनिदान, असंघटित कामगारांचा हक्क , अनैतिक व्यापाराला बळी पडलेल्या महिला व मुले यांना कायदेशीर मदत , मनोरुग्ण व्यक्तींना औषधोपचार , गरिबी निर्मूलन यासाठी मदत, व्यसनाधीन व मादक पदार्थास बळी पडलेल्या व्यक्तींना कायदेशीर मदत, निराश्रित लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, बालमजुरी प्रतिबंधक व बालकामगार कायद्याबाबत जागृती , पर्यावरण रक्षणासाठी जागृती, रॅगिंग विरोधी कायदा, सायबर गुन्हेगारी, शिक्षणाचे अधिकार याबाबत मार्गदर्शन केले
जिल्हा प्राधिकरणाचे सचिव ए. के. शेख अध्यक्षपदी होते. या शाळेचे मुख्याध्यापक पी. पी. कोल्हे, उपसरपंच मिठाराम पाटील, माजी सरपंच रामकृष्ण काटोले, माजी उपसरपंच श्रावण ताडे, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत अस्वार, गौतम खैरे, पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी, शाळेचे पर्यवेक्षक एस. एस. बारी, संचालक निलेश बारी, प्रवीण पाटील , शालीग्राम पवार, भारती कुमावत, ॲड. विजय दर्जी, जावेद पटेल व विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन केतकी सावंत, संजना बारी व अंजली काटोले यांनी केले.







