जामनेर ( प्रतिनिधी ) – उत्तर प्रदेशातील लखिंपुर खेरी येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारण्याच्या घटनेविरोधात आज महाविकासआघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे जामनेर तालुक्यात पहुर , शेंदुर्णी , पाळधी , नेरी , वाकडी , फत्तेपुर, वाकोद आदी गावांमध्ये व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली जामनेर तालुक्यात महाराष्ट्र बंदला प्रतिसाद मिळाला .


शहरातील नगरपालिका चौकात महाविकासआघाडीतर्फे रस्ता रोको आंदोलन करून घटनेचा निषेध करण्यात आला महाविकासआघाडीतर्फे तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन सादर करण्यात आले याप्रसंगी नियोजन मंडळ सदस्य संजय गरुड , युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील , माजी जिल्हा परिषद सदस्य डी के पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पाटील , शिवसेना प्रवक्ता गणेश पांढरे , राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील , काँग्रेसचे शंकर राजपूत , प्रल्हाद बोरसे, विलास राजपूत, शिवसेना शहर प्रमुख अतुल सोनवणे, सुधाकर सराफ , एड भरत पवार , राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष डॉ प्रशांत पाटील , युवा सेनेचे तालुकाध्यक्ष विशाल लामखेडे , उस्मान भाई , अशोक जाधव , नरेंद्र जंजाळ, अरविंद चितोडिया आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पहूर येथे जि प चे माजी कृषी सभापती प्रदीप लोढा , भास्कर पाटील , उपसरपंच श्याम सावळे , शिवसेना शहर प्रमुख , संजय तायडे , सुकलाल बारी, अशोक जाधव , शैलेश पाटील, किरण पाटील, आमीन शेख, आरिफ शेख , सादिक पठाण, शरद पांढरे, ईश्वर बारी , अशिष माळी, राजू पाटील, पुंडलिक सोनवणे आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
नेरी येथे आघाडीचे पदाधिकारी विनोद सोनवणे , अरुण पाटील, शिवाजी पवार, नाना, निलेश खोडपे , विलास खोपडे , रुपेश पाटील, राजू पाटील, श्याम बोरसे आदि कार्यकर्त्यांनी बंदचे आव्हान केले होते.
शेंदुर्णी येथे नियोजन मंडळ सदस्य संजय गरुड , शिवसेना उपतालुका प्रमुख डॉ सुनील अग्रवाल , रवींद्र गुजर , अजय भोई , बारकू जाधव, विलास बारी , अशोक बारी, शहरप्रमुख भैय्या गुजर, विलास पाटील, अजय भोई आदी पदाधिकारी उपस्थित होते.







