जळगाव शहर पोलीस स्टेशनची कामगिरी

जळगाव ( प्रतिनिधी ) – घरफोडी आणि बांधकाम साहित्य चोरणाऱ्या २ आरोपींना आज पोलिसांनी गुप्त माहिती काढून पकडले . त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
शहर पोलीस ठाण्याचे पो .नि .ठाकूरवाड यांनी दिलेल्या माहिती नुसार पो. ना. भास्कर ठाकरे आणि पो.कॉ. प्रवेश ठाकूर यांनी आधी गुप्त माहिती मिळवून या आरोपींची शहानिशा केली होती . पो. हे. कॉ. उमेश भांडारकर आणि संतोष खवले यांच्या मदतीने ते आरोपींपर्यंत पोहचले . ७ ऑक्टोबररोजी हर्षल गायकवाड यांनी त्यांच्या साईडवरून ८३ हजार रुपयांचे बांधकामाचे साहित्य व मटेरियल चोरी झाल्याची फिर्याद दाखल केली होती. हा मुद्देमाल या आरोपींकडे सापडला आहे या गुन्ह्याची कबुली देताना अन्य चार साथीदारांची माहितीही या आरोपींनी दिली आहे. त्या साथीदारांच्या चौकशीत शहर पोलीस ठाण्यात ३ ऑक्टोबर रोजी दाखल झालेल्या ५ हजार रुपयांच्या घरफोडीचीही कबुली या साथीदारांनी दिली या कारवाईत पो.हे. कॉ विजय निकुंभ , पो.ना. गणेश पाटील , रतन गीते , राजकुमार चव्हाण सहभागी झाले होते .







