रावेर ( प्रतिनिधी ) – स्थानिक पोलिसांनी मध्य प्रदेशातून लालमाती मार्गे महाराष्ट्रात गुरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला त्यात 50 हून अधिक गुरे असल्याचे प्राथमिक माहितीवरून दिसून आले तीन दिवसात गुरांच्या तस्करीवर पोलिसांची ही दुसरी कारवाई आहे.

आज दुपारी मध्यप्रदेश शेरी नाका मार्गे रावेरकडे अवैध गुरांनी कोंबुन भरलेला ट्रक येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली पो नि कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी लालमाती नजिक जेके 01 – एएल –1559 क्रमांकाचा ट्रक पकडला. झडती घेतली असता त्यात कोंबुन सुमारे ५० च्यावर गुरे भरलेली दिसली . ही सर्व गुरे जळगावच्या बाफना गौ शाळेत पाठवण्यात आली पाल पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला मंडसोळ (मध्य प्रदेश) येथील दोन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले
दोन दिवसांपूर्वी चोरवड येथे कोंबुन वाहतूक केली जात असलेल्या २८ गुरांना जिवनदान देऊन पो उनि सचिन नवले प्रकाशझोतात आले त्यांनी आज पुन्हा धडक कारवाई केली त्यांच्यासोबत पोलिस कर्मचारी संदीप धनगर , राजेंद्र राठोड , इस्माल तडवी , सुकेश तडवीदेखिल होते.







