पारोळा ;- लॉक डाउन सुरु असल्याने तालुक्यातील दारू दुकानें ,हॉटेल्स बंद आहेत .यामुळे दारू पिणाऱ्याची गर्दी आता गावठी दारू कडे वळाल्याने तालुक्यासह शहरात दारूचा महापूर वाहत आहे. संचारबंदी असूनही व कोणतेही नियम न पाळनाऱ्या ,कायदा व पोलिसांची भीती न बाळगनाऱ्या गावठी दारू विक्रेते आणि त्या ठिकाणी होणारी तळीरामाची गर्दी मुळे कोरोनाचा संसर्ग पसरन्याची भीती निर्माण झाली आहे.याबाबत तालुक्यातील जनतेमध्ये दारूविक्रेत्याविषयी प्रचंड चीड निर्माण झाली आहे .
कोरोनाची भीती असल्याने तालुक्यातील अनेक गावातील लोक दारू बंदी साठी पुढे येत आहेत .
या पार्श्वभूमिवर पारोळा पोलीस स्टेशनलचे पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली दारू विक्रेत्या विरुद्ध कडक मोहीम राबविली जात आहे.
वंजारी खू,हिरापुर सह इतर गावातील दारू भट्ट्या उध्वस्त –
पारोळा तालुक्यातील वंजारी खू. हिरापूर, भोकरबारी, शेळावे ,मोंढाळे आणि दबापिंपरी या गावातील सुरु असलेल्या दारू भट्ट्या उध्वस्त केल्या असून रसायन व साहित्य असे पोलिसांनी नष्ट केले तर दबापिंपरी येथील पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या या धडक कारवाई मुळे दारू विक्रेत्यामध्ये भीती निर्माण झाली असून तालुक्यातील जनतेकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.