मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – धुळे पावरी वाडा येथील जि प मराठी शाळेत वन्य जीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.


या शाळेत वृक्षारोपण विदयार्थी व विद्यार्थीनीनी केले या गावातील नागरिकांसोबत बडोद्याचे वनरक्षक एस पी, देवरें याच्या हस्ते वृक्ष लावण्यात आले त्यांनी वन्य जीवविषयी मार्गदर्शन केले.
वनरक्षक एस पी, देवरें म्हणाले की , वृक्ष व वनस्पतीपासून औषधी निर्माण होत असते म्हणुन संपूर्ण जग आर्वेदिक औषधीचा उपचार घेत आहे या करिता वृक्ष लागवड ची काळाची गरज आहे लहान वन्य प्राण्यांच्या जीवावर मासभक्षी प्राणी अवलंबून असतात वडोदा वन क्षेत्रामध्ये निल गाय, चितळ , रान गाय , कोल्हा, लांडगा , अस्वल, रानडुक्कर, साप , ससा , लांडोर, मोर , पट्टेदार वाघ, बिबट्या, तळस, माकड इत्यादी वन्यप्राणी असतात त्यांच्यावर प्रेम करा कुणी शिकार करत असेल तर आम्हाला कळवा त्यांच्याबद्दल अफवा पसरू नका यावेळी वन मजूर अशोक तायडे , ग्रामस्थ व विद्यार्थी हजर होते.







