चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – देवीची ज्योत घेऊन येताना तालुक्यातील वाघळी येथील बंधाऱ्यात आंघोळीला गेलेल्या १८ वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीला आली आहे मृतदेहाचा शोध घेतला जात आहे.

घटस्थापनेसाठी देवीची ज्योत सप्तश्रृंगी गडावरून घेऊन येत असताना तालुक्यातील वाघळी येथील बंधाऱ्यात आंघोळीला गेलेल्या सुनिल वाघमारे (वय-१८ , रा. शेंदुर्णी ता. जामनेर ) या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली आहे. या दुदैवी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सुनिल याचा मृतदेह मिळून न आल्यामुळे ग्रामीण पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. देवीची ज्योत घेऊन निघालेल्या या युवकाची प्राणज्योत मावळल्याने हळहळ व्यक्त होत आहे.







