जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील तहसीलदार कार्यालयात काल तालुका दक्षता समितीची जवळपास दीड वर्षानंतर पहिली बैठक पारोळ्याचे आमदार व समितीचे अध्यक्ष चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ही पहिली बैठक असल्याने आमदार चिमणराव पाटील यांनी नवनियुक्त सदस्यांना एकूणच कामकाजाबद्दल मार्गदर्शन केले यावेळी प्रामुख्याने रास्त धान्य दुकानांमधील व्यवस्था आणि समस्यांबद्दल सविस्तर चर्चा झाली.


तहसीलदार , पंचायत समिती सभापती , गट विकास अधिकारी , सदस्य भरती पाटील ,अरुणा लाठी , लता गवळी , अर्जुन पाटील , मीना महाजन , रत्नमाला काळुंखे , धोंडू जगताप , देविदास कोळी , विकास पाटील हे या बैठकीत सहभागी झाले होते .







