जालना ( प्रतिनिधी ) – अतिवूष्टीमुळे जालना जिल्यातील भोकरदन तालुक्यातील तडेगाव येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या हानीची पाहणी नुकतीच कृषी सहाय्यकांनी केली

सतत पाऊस पडत असल्यामुळे. उडीद, सोयाबीन, मुग, कापूस, मिर्ची, अद्रक, शेडनेटमधिल सर्व पिके व फळबागा तसेच ऊस पडून प्रचंड नुकसान झाले आहे तर काही ठिकाणी पाझर तलाव फुटल्याने पिकासह जमीन वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठया प्रमाणात नुसकान झाले आहे. भोकरदन तालुक्यातील कृषी सहाय्यक ढगे ,. तलाठी प्रभाकर वाघ ,. तडेगाववाडीचे सरपंच राजुसींग बमणावत. यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली यावेळी तडेगाववाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते.







