जळगाव ( प्रतिनिधी ) – इच्छादेवी मंदीरासमोर खुबचंद साहित्या बिल्डिंगजवळ कल्याण मटका खेळणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले दोघांवर जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला

स्वप्निल तुकाराम तायडे (वय-२६ , रा. जळगाव जामोद ह.मु. हरीविठ्ठल नगर ) आणि दिपक किसन बिऱ्हाडे (वय-२६ , रा. आंबेडकर नगर आसोदा ) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
इच्छादेवी मंदीर चौकात खुबचंद साहित्या बिल्डींगच्या आडोश्यात कल्याण मटका खेळ सुरु असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि किरणकुमार बकाले यांना मिळाली. पोहेकॉ निजामोद्दिन शेख, सुरज पाटील, पो कॉ. दिपककुमार शिंदे , पो कॉ हेमंद पाटील यांनी दुपारी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यात स्वप्निल तायडे आणि दिपक बिऱ्हाडे यांना जागेवरच पकडले. दोघांची अंगझडती घेतली दोघांकडून ७ हजार ४३० रूपयांची रोकड व जुगार खेळण्याचे साहित्य हस्तगत केले . पो.कॉ. हेमंत पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.







