चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील तळोदे येथील माहेर आसलेल्या २९ वर्षीय विवाहितेचा माहेरहून कार घेण्यासाठी ५ लाख रुपये आणावे यासाठी छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळींविरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील तळोंदा माहेर असलेल्या योगिता भूषण हिरे (वय-२९) यांचा विवाह १८ फेब्रुवारी २०१३ रोजी नाशिक जिल्ह्यातील सोयगाव येथील भूषण मधुकर हिरे यांच्याशी झाला. लग्नाच्या सहा महिन्यानंतर पती भूषण अहिरे याने कार घेण्यासाठी ५ लाख रुपये आणावे यासाठी विवाहितेला तगादा लावला. परंतू आईवडीलांची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे ५ लाख रूपये देवू शकले नाही. त्यामुळे विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. यासाठी सासु सुनंदा, मधुकर अहिरे, नणंद पल्लवी किशोर अहिरे, नंदोई किशोर बाळासाहेब अहिरे ( सर्व रा. सोयगाव ता.मालेगाव जि. नाशिक ) यांनी गांजपाठ केला. या छळाला कंटाळून विवाहिता तळोंदे येथे माहेरी निघून आल्या. विवाहितेने पतीसह सासरच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती, सासू, नणंद आणि नंदोई या चार जणांवर मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय पाटील करीत आहेत.