चोपडा ( प्रतिनिधी ) – आज 5 ऑक्टोबर हा माजी खासदार स्व. केशरकाकू क्षीरसागर यांचा स्मृती दिवस चोपडा तेली समाजाने त्यांना अभिवादन करून साजरा केला.
प्रदेश तेली महासंघाची जळगाव जिल्हा शाखा , श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा ,महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संताजी जगनाडे महाराज मंदिर, श्रीराम नगर, चोपडा येथे स्व काकूंना अभिवादन करण्यात आले. स्व काकूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून समाजातील पदाधिकाऱ्यांनी पुष्पांजली अर्पण केली.
चोपडा तेली समाजाचे उपाध्यक्ष व निवृत्त मुख्याध्यापक टी. एम. चौधरी यांनी काकूंच्या कार्याचा गौरव केला. काकू म्हणजे नेतृत्व, कर्तुत्व व दातृत्वाचा सुरेख संगम होत्या . त्यांनी शाळा कॉलेजेस काढून शिक्षणाची सोय केली गरजू आणि गरिबांना स्वतःच्या पायावर उभे केले. देशात फिरून समाज संघटनेचे, समाजाला उभे करण्याचे, समाजाला ताकद देण्याचे काम केले. तेच काम त्यांचे सुपुत्र माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचा परिवार करीत असल्याचे नमूद केले. के .डी. चौधरी यांनी अभिवादन करून काकूंच्या सोबत काम केल्याचा आनंद व्यक्त केला. जयदत्त क्षीरसागर यांच्या मागे समाज खंबीरपणे उभा असल्याचे नमूद केले. यावेळी टी. एम .चौधरी, संजय चौधरी, संताजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष देवकांत के. चौधरी, तालुकाध्यक्ष प्रशांत चौधरी , ह- भ- प गोपीचंद महाराज, ह भ प ज्ञानेश्वर नेरकर महाराज आदीची उपस्थिती होती.