पहूर ता. जामनेर ( प्रतिनिधी ) – नाचणखेडा येथे बाजारात आलेल्या एका व्यक्तीचे १३ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष तुकाराम चौधरी (वय-४५ , रा. नाचणखेडा ) गावातील आठवडे बाजारात भाजीपाला घेण्यासाठी दुपारी आले होते. त्यांच्या खिशात असलेले १३ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेले. त्यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. प्रदीप चौधरी करीत आहेत.