पाचोरा ( प्रतिनिधी ) – शहरातील संघवी कॉलनी येथे महावितरणचे बंद कार्यालय अज्ञात चोरट्यांनी फोडून सामानाची नासधूस करीत कागदपत्रे फेकण्याचा प्रकार उघडकीला आला. अज्ञात चोरट्यांवर पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोऱ्यातील महावितरणच्या कार्यालयात ३ ऑक्टोबररोजी दुपारी ४ ते ४ ऑक्टोबर सकाळी ८ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने महावितरणाचे बंद कार्यालय फोडून आत प्रवेश करत लोखंडी कपाट तोडले. कपाटात ठेवलेले कागदपत्र फेकून नुकसान केले आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता रवींद्र शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.फौ. प्रकाश पाटील करीत आहे.