यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील नायगाव शिवारातील विहिरीतून इलेक्ट्रिक वायरची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचे काल उघडकीला आले यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रसन्न देशमुख (वय-४८ , रा. नायगाव) हे शेतकरी आहेत. नायगाव शिवारात त्यांचे शेत आहे. शेतातील विहिरीजवळच्या इलेक्ट्रिक मोटारची दीड हजार रूपये किंमतीची वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे रविवारी उघडकीला आले . प्रसंन्न देशमुख यांनी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करीत आहेत.