सावदा (प्रतिनिधी) – येथील नागरिकांनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अर्ज केले होते ज्यांची नावे डी. पी.आर. मंजूर होऊन आली त्या नागरिकांनी घरे बांधली, काहिनी उसनवारी करून, उधार वा कर्ज काढून बांधकाम केले काहिचे बांधकाम लाभाची रक्कम पूर्ण मिळाली नसल्याने अपूर्ण असून असे लोक भाडयाचे घरात राहत आहेत , या नागरिकांना मंजूर लाभाची रक्कम मिळत नसल्याने व घर बांधकाम सुरु असल्याने वा पूर्ण करून झाले तरी मिळत नसल्याने ही लाभाची रक्कम त्वरीत मिळावी अशा मागणीचे निवेदन काल सावदा शहर शिवसेनेतर्फे नगर पालिका मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांना देण्यात आले
यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख धनंजय चौधरी, शिवसेना शहर प्रमुख सूरज परदेशी, भरत नेहेते, रा.कॉ. नगरसेवक सिद्धार्थ बड़गे, रा. कॉ. महिला शहराध्यक्षा कल्पना ठोसरे, शिवसेना उपशहर प्रमुख गौरव भैरव, संघटक नीलेश खाचणे, शरद भारंबे, युवा सेना शहर प्रमुख, मनीष भंगाळे, गणेश माळी, शेख, चांद शेख शब्बीर, शेख नाजीम, हसन तडवी, नितिन सपकाळे, चेतन माळी आदी उपस्थित होते.