मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात तसेच देशात कोरोनाचा धोका झपाट्याने वाढत असताना कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे शनिवारी राज्यात 328 नवीन रुग्ण आढळले आणि राज्यातील करोनाबधित रुग्णांची संख्या 3,648 वर पोहोचली. देशात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतीही आस्थापने सुरु करण्याची परवानगी नाही. रेल्वे, विमान वाहतूक सेवा ठप्प आहे. मात्र सागरी वाहतूक अद्यापही सुरु असल्याचं मनसेने सांगितलं आहे. भारताच्या कुठल्याही सागरी सीमेवर येणाऱ्या जहातल्या प्रत्येक कर्मचारी, अधिकारी व कामगारांची सक्तीने तपासणी करून त्यांना १४ दिवस त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याबाबत .सागरी व्यवसायाला सुरक्षित ठेवू शकते . सुरवातीला अडचणीचे वाटले तरी हे करणे अत्यंत गरजेचे. मनसेने ट्विट करत पत्र लिहिले आहे की,’ सरकारने सागरी सीमांबाबतीतही अधिक सतर्क राहणे आणि तातडीच्या उपाययोजना करणं गरजेचं आहे; महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेनेची आग्रही मागणी.’ तसेच #लढाकोरोनाशी #महाराष्ट्रसैनिक अशा हॅशटॅगचा वापर करत पत्रक पोस्ट केले आहे. दरम्यान, मनसेच्या नाविक सेना युनियनमार्फत केंद्र सरकारच्या जहाज आणि बंदरे विभागाला पत्र पाठवण्यात आलं आहे. या पत्रामध्ये, ‘नोवेल कोरोना व्हायरसने सागरी दळणवळणातदेखील प्रवेश केला आहे. दुबई येथील नौकेतल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली असल्याने त्यांची आपत्कालीन सुटका करण्यात आली आहे. भारतात तर मोठी बंदरे आहेत. सागरी मार्गाने कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी भारतीय बंदरावर येणाऱ्या प्रत्येक नौकेतील कामगार, कर्मचारी-अधिकारी यांची कोरोनाची चाचणी करण्यात यावी. त्यांना सक्तीने १४ दिवस क्वारंटाईन करण्यात यावं तसेच संबंध नौकेचे सॅनिटायझेशन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.’