जळगाव ( प्रतिनिधी ) – काल दिल्लीत घडलेल्या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आज जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले . स्थानिक शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्तेही या आंदोलनाला पाठिंबा देत सहभागी झाले होते.
प्रचंड घोषणाबाजी आणि आंदोलनकर्त्यांनी मोदी सरकारच्या निषेधार्थ बोंबा मारल्यामुळे परिसरात या आंदोलनाची चर्चा होती . लोकसंघर्ष मोर्चा , अखिल भारतीय किसान संघर्ष समिती व संयुक्त किसान मोर्चा यांनी या आंदोलनासाठी पुढाकार घेतलेला होता निदर्शने आणि घोषणा देत मोदी सरकारचा निषेध केल्यानांतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले .
यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे यांनी सांगितले की , दिल्लीच्या सीमेवर नव्या कृषी कायद्यांच्या विरोधासाठी देशभरातील शेतकऱ्यांचे २६ नोव्हेंबर २०२० पासून आंदोलन सुरु आहे. शानतेत हे आंदोलन सुरु आहे हे आंदोलनकर्ते बऱ्याचदा खासदार आणि मंत्र्यांना काळे झेंडे दाखवत सरकारच्या धोरणाचा निषेध शांततेत करतात . असेच हे आंदोलनकर्ते काल उत्तरप्रदेशात लखीमपूर भागात उपमुख्यमंत्र्याला आणि खासदाराला निषेधाचे झेंडे दाखवत होते मात्र एका खासदाराच्या पोराने थेट आंदोलकांवर वाहन घालत त्यांना चिरडले या घटनेत शेतकरी आणि एका पत्रकारांसह ९ लोक जागीच ठार झाले या हत्याकांडाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली झाली पाहिजे , या हत्याकांडातील मयताच्या वारसांना प्रत्येकी १ कोटी रुपये भरपाई सरकारने द्यावी आणि प्रत्येक मयताच्या कुटुंबातील एका वारसाला तात्काळ सरकारी नोकरी द्या नवे काळे कृषी नकायदे तात्काळ रद्द करा अशा आमच्या मागण्या आहेत
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भन्गाळे म्हणले की , दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना भारतभरातील शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे उत्तर प्रदेश सरकार या दोषींना अभय देत आहे हे निषेधार्ह आहे त्यामुळे आजच्या या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा आहे आणि यापुढेही आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आंदोलन पुढे नेत राहू.
जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले की , सुरुवातीपासूनच काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. मोदी सरकारने त्यांची हुकूमशाही थांबवावी त्यांनी असे घाणेरडे प्रकार बंद करावेत. आम्ही सगळे शेतकऱ्यांसोबत आहोत मोदी सरकारने भूमिका बदलली नाहीतर आम्हाला आंदोलन तीव्र करावे लागेल.







