जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील सिंधी कॉलोनीतील सट्टा अड्ड्यावर धाड टाकून आज एम आय डी सी पोलिसांनी १८ आरोपींना अटक केली त्यांच्या ताब्यातून रोख रकमेसह सुमारे साठ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले.
एम आय डी सी पोलिस ठाण्याचे पो कॉ किशोर पाटील यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार या १८ आरोपींची नावे पुढीलप्रमाणे – प्रकाश कुकरेजा ( वय ६५ , सिंधी कॉलनी ), सुरेश ( डाबू ) भाट ( ४८ , नेत्रज्योती सोसायटी जवळ ), रोहित भाट ( २२), शांताराम पाटील ( ६५ , तांबापुरा ), इम्रानखान हमीदखान ( ३८ , तांबापुरा ), गजानन लकडे ( ५२ , शनिपेठ , चंदनवाडी ), निलेश लढ्ढा ( ५० , अशोक बेकरीजवळ , विष्णूनगर ), विनोद सपकाळे ( ४२ , समतानगर ), पंडित चव्हाण, कैलास बारेला, अशोक नेवे, पांडुरंग नाभणे, मुरलीधर चव्हाण, भिका गंडाळे, अशोक मकडीया, राजू पवार, बुधा झणके, अय्युब खाटीक हे सट्टा खेळताना व घेताना मिळून आले. सर्व संशयितांकडून ५९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पो ना गणेश शिरसाळे करीत आहेत .