जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा कोवीड रुग्णालयाने आज दिलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात आज दिवसभरात तीन बाधित रुग्ण आढळले आहे तर एका रुग्णाने कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७४६ बाधित रुग्ण आढळून आले यापैकी १ लाख ४० हजार १६० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत . त्याचप्रमाणे २ हजार ५७५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ११ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत , अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी आज सायंकाळी दिली.