वर्धा (वृत्तसंस्था) – कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कोरानाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढ चालली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सोशल डिस्टन्स पाळण्याचे जनतेला आवाहन करण्यात येत आहे. मात्र वर्धा जिल्ह्यातील समुद्रपुर येथिल आठवडी बाजारात आज भाजी खरेदीसाठी नागरीकांनी तोबा गर्दी केली. सोशल डिस्टन्सिंगचे तिनं तेरा वाजविल्याचा प्रकार आज दिसून आला आहे. वर्धा जिल्ह्यातील अद्यापही एकही कोरोनाबाधीत रुग्ण आढळाला नाही. तरी देखील खबरदारी म्हणून पोलीस व महसूल प्रशासन जिल्ह्याला कोरोनापासून दुर ठेवण्यासाठी जिवाचे रान करत आहे. नागरिकांना विनाकारण घरा बाहेर पडू नका, सोशल डिस्टन्स पाळून कामे करता असे कळकळीचे आवाहन केले जात आहे. मात्र जिल्ह्यातील समुद्रपुर शहरात आज भरलेल्या आठवडी बाजारात नागरीकांनी भाजी खरेदीसाठी एकच तोबा गर्दी करुन शोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडविला आहे.