भुसावळ ( प्रतिनिधी ) – शहरातील तीस वर्षीय विवाहितेला मुलाचे अपहरण व पतीला ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची घटना आज उघडकीला आली एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.

भुसावळ शहरात ३० वर्षीय विवाहिता पती व मुलासह राहते. गेल्या वर्षी २०२० च्या रमजान महिन्यापासून ते सप्टेंबर २०२१ महिन्यापर्यंत संशयित आरोपी शेख जमशेद शेख शमीम उर्फ जम्मूई याने विवाहितेला तिच्या मुलाच्या अपहरणाची धमकी व पतीला ठार मारण्याची धमकी देऊन दबाव आणून इच्छेविरुद्ध अत्याचार केले. मुलाच्या अपहरणाची व पतीस ठार मारण्याची धमकी दिली असल्याने तिने घाबरून त्यावेळी तक्रार केली नाही. परंतु तिच्या पतीने मनातील भीती दूर केल्याने विवाहितेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शेख जमशेद शेख शमीम याच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा झाल्यानंतर संशयित आरोपीला अटक करण्यात आली . पुढील तपास पो. उ. नि. शांताराम महाजन करीत आहे.







