जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील भांडारपाल मिलिंद काळे यांची ३ वर्षांपूर्वी अहमदनगरला बदली झालेली असूनही ते वरिष्ठांच्या आशीर्वादाने जळगावातच असल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रशासकीय अनागोंदीची चौकशी करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी केली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , या चौकशीची मागणी करणारे निवेदन त्यांनी जळगावच्या जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सकांसह राज्याचे आरोग्य संचालक , नाशिकचे आरोग्य उपसंचालक , अहमदनगरचे जिल्हा शल्य चिकित्सक आणि आरोग्यमंत्र्यांनी दिले आहे. भांडारपाल मिलिंद काळे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजी चव्हाण योनीची आधीच खरेदी गैरव्यवहाराच्या आरोपांवरून चौकशी सुरु आहे. मिलिंद काळे याना जळगावच्याच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात विविध पदांवर नियुक्त करून बदलीच्या ठिकाणी जाऊ दिलेले नाही. याबद्दल आपण नाशिकच्या आरोग्य उपसंचालकांकडे स्वतंत्रपणे तक्रार करणार आहोत.







