जळगाव ( प्रतिनिधी ) – राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते माजी मंत्री महादेव जानकर व आमदार डॉ रत्नाकर गुट्टे हे पंचायत राज दौऱ्यात जिल्ह्यात आल्या निमित्त पक्षाची जिल्हा आढावा बैठक सोमवारी जळगाव येथे झाली

या बैठकीस माजी मंत्री महादेव जानकर , प्रदेशाध्यक्ष आमदार रत्नाकर गुट्टे यांनी मार्गदर्शन केले यावेळी रासपचे उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी दांडगे पाटील , उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ पोतारे , अल्पसंख्या आघाडी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शेख सय्यद बाबा , जळगाव जिल्हा महानगर प्रमुख शिंगाळे , ग्रामीण जिल्हाप्रमुख समाधान पाटील , महिला जिल्हाध्यक्षा , महिला तालुकाध्यक्षा श्रीमती जाने ( नाशिक ) , विभागप्रमुख आव्हाड , विलास पिंगळे, एरंडोल तालुकाध्यक्ष राजू चौधरी , उपतालुकाध्यक्ष अभयसिंग पवार, तालुका सरचिटणीस गोपाल महाजन, रिक्षा युनियन आघाडीचे निंबा पाटील , आदिवासी सेल तालुकाप्रमुख शैलेश बारेला , व्यापारी आघाडीप्रमुख संतोष वंजारी यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष, उपाध्यक्ष, गटप्रमुख , गणप्रमुख , शहराध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

माजी मंत्री महादेव जानकर व आमदार रत्नाकर गुट्टे यांनी सांगितले की, येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणुका पक्षाच्या चिन्हावर व स्वबळावर लढा . तालुका व शहरामधील जनतेला केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घराघरापर्यंत पोहोचवा त्या योजनेच्या अधिकाऱ्यांना निवेदने द्या लोकांचे प्रस्ताव सादर करा आगामी काळात पक्षाचे वीस ते पंचवीस आमदार निवडून येतील आता सध्या आपले दोनच आमदार आहेत लोकसभा व विधानसभेमध्ये पक्षाचे पाच खासदार व वीस-पंचवीस आमदार निवडून येतील अशी पक्षाची बांधणी करा
या बैठकीनंतर एरंडोल तालुका व शहर राष्ट्रीय समाज पक्षातर्फे माजी मंत्री महादेव जानकर व आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांचा सत्कार करण्यात आला







