नाशिक ( वृत्तसंस्था ) – चौथीत शिकणाऱ्या नऊ वर्षांच्या मुलीवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना सिन्नर तालुक्यातल्या औंढेवाडी येथे घडली .

पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीपैकी एक सोळा वर्षांचा अल्पवयीन मुलगा आहे. सध्या शेतीची कामे सुरू आहेत. त्यामुळे मुलीचे आई-वडील तिला घरात ठेवून शेतात कामाला जात असत. मुलगी घरात एकटी असते, यावर नजर ठेवून शंकर निवृत्ती कुंदे (वय 43, रा. औंढेवाडी) याने मुलीवर बलात्कार केला. तिच्या राहत्या घरी शेतात नेऊन हा अत्याचार केला. अत्याचार केल्याची माहिती कुणाला सांगितल्या कुटुंबाला ठार मारेन, अशी धमकी दिली. त्यानंतर एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलानेही मुलीवर तीन वेळा अत्याचार केला. त्यामुळे मुलीच्या पोटात दुखू लागले. हा त्रास असह्य झाल्याने तिने आई-वडिलांना सांगितले. आई-वडिलांनी विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिच्यावर दोघांनी अत्याचार केल्याचे समजले. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी तातडीने दोघांविरुद्ध सिन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अल्पवयीन संशयितासह गणेश कुंदेला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी करत आहेत.







