जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील प्रभाग क्र ८ दादावादी जैन मंदिर , श्रीरामनगरसह परिसरातील कॉलण्यांमध्ये दसर्यापूर्वी पथदिवे दुरुस्त करून गरजेनुसार नवे पथदिवे न बसवल्यास या भागातील नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करू असा इशारा नगरसेवक डॉ चंद्रशेखर पाटील यांनी दिला आहे

या मागणीसाठी इशारा देणारे निवेदन नगरसेवक डॉ चंद्रशेखर पाटील यांनी आज महापालिका आयुक्तांना दिले या पथदिव्यांच्या कामासाठी वेळोवेळी प्रशासनाकडे लेखी आणि तोंडी तक्रारी करूनही काहीच फायदा झाला नाही असे त्यांचे म्हणणे आहे या भागात नव्याने उभारण्यात आलेल्या खांबांवर पथदिवे नाहीत बऱ्याच पथदिव्यांच्या दुरुस्तीची गरज आहे असेही त्यांनी या निवेदनात म्हटले आहे







