जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील न्यू सम्राट कॉलनीत २७ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रात्री घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती असी की. जळगाव शहरातील न्यू सम्राट कॉलनी येथे रहिवासी लक्ष्मण अशोक जाधव वय २७ वर्ष याने काल २७ रोजी रात्री साडेदहावाजेच्या पूर्वी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या का केली याचं कारण अद्याप पर्यंत कळू शकले नाही. याबाबत जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये जळगाव शासकीय रुग्णालयातील CMO डॉ. श्रावणी हुंबे यांनी खबर दिल्या वरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील प्राथमिक तपास पो. हे. काँ. सचिन मुढे,छगन तायडे हे करीत आहे







