चाळीसगाव ( प्रतिनिधी ) — तालुक्यातील उपखेड शिवारातील शेतकऱ्यांचा विद्यूत पंप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता या गुन्ह्यात मेहुणबारे पोलिसांनी तीन जणांना अटक केली होती. तिघांची न्यायालयालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

चाळीसगाव तालुक्यातील उपखेड येथील शेतकरी उद्धव मगर (वय 37) यांचे व खेड शिवारात शेत आहे. जवळच गिरणा नदी पात्रात त्यांनी इलेक्ट्रिक मोटर बसवले आहे. इतर शेतकऱ्यांनी देखील काही विद्यूत पंप त्या ठिकाणी लावलेल्या आहेत. 22 सप्टेंबररोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी इलेक्ट्रिक मोटर आणि केबल वायरीं चोरून नेल्याचे उघडकीला आले होते.
उद्धव मगर यांच्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपी गणेश पाटील (वय 28), दिनेश ठाकरे (वय-२१) आणि दिगंबर खैरनार (वय 23 , सर्व रा — उपखेड ) यांना 24 सप्टेंबररोजी मेहुणबारे पोलिसांनी अटक केली होती. त्यांची आज पोलिस कोठडी संपल्यानंतर तिघांची न्यायालयालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.







