जळगाव ( प्रतिनिधी )– केंद्र शासनाच्या सामान्यांच्या विरोधात असणाऱ्या धोरणांच्या विरोधात आज देशव्यापी भारत बंद पाळण्यात येत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बाजारपेठेतून रॅली काढून व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन आज केले. भारत बंदला शहरातून संमिश्र प्रतिसाद मिळाला

केंद्र सरकारने लागू केलेल्या शेतकरीविरोधी तीन काळे कायद्याच्या विरोधात विविध मागण्यांसाठी आज देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. भारत बंदची हाक सर्व पक्षांनी एकत्र येऊन दिली आहे. कायद्याची तोडमोड करून देशात हुकुमशाही आणण्याचा कट मोदी सरकारने केला आहे. याला तोंड फोडणे आवश्यक असल्याने भारत बंदचे आयोजन करण्यात आले आहे.
दिल्लीत अकरा महिन्यांपासून शेतकरी काळे कायदे रद्द करण्यासाठी ठाण मांडून बसले आहेत. या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी व शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्यात यावे, इंधन दरवाढ कमी करावी, या मागणीसाठी भारत बंद आंदोलन करण्यात आले आहे. काँग्रेसच्या काळात उभारण्यात आलेल्या सत्ता संपत्ती मोदी सरकारला उभारता आले नाही. उलट ते विक्री धोरण अवलंबले आहे.
आज शहरातील फुले मार्केट परिसर, दाणाबाजार परिसर, जुने बस स्थानक परिसर, नेहरू पुतळा ते टॉवर चौकात दरम्यान दुकाने, गोलाणी मार्केट, न्यू बीजे मार्केट परिसरात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ.उल्हास पाटील ,राष्ट्रवादी कार्याध्यक्ष विलास पाटील, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब पवार, प्रदेश प्रवक्ता योगेश देसले, युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष, रवी पाटील, महानगराध्यक्ष शाम तायडे, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, जनरल सेक्रेटरी जमील शेख यांच्यासह नेते रस्त्यावर उतरून दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करत होते.







