एरंडोल ( प्रतिनिधी ) — येथील तहसिल कार्यालय आवारात भारतीय संविधान उद्देशिकेशियसह संविधान स्तंभ उभारण्याची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)कडून तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.


निवेदनात नमूद करणेत आले आहे की , भारतीय संविधानाची माहिती व महत्व पिढीला माहिती समजावे बंधू भाव आणि समानतेचे मूल्य तरूण पिढी मध्ये रूजावेत यासाठी एरंडोल कार्यालय आवारात भारतीय संविधान उद्देशिकेसह संविधान संतभ उभारण्यात यावा.निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, नासिक विभागीय आयुक्त, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले , जिल्हाधिकारी , उपविभागीय अधिकारी भाग एरंडोल यांना देण्यात आले निवेदनावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) एरंडोल तालुकाध्यक्ष प्रविण बाविस्कर, तालुका सचिव देवानंद बेहेरे, सिताराम मराठे, गजानन पाटील, सुनील खोकरे, मन्सूर पठाण आदींच्या सह्या आहेत.







