सावदा ( प्रतिनिधी ) – कोचुर खुर्द गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील विजेच्या खांबावरील तार तुटून पडल्याने पाच बकऱ्यांचा मृत्यू झाला . सकाळी बकऱ्यांना चारण्यासाठी नेत असतांना हा अपघात घडला संबधितांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

कोचुर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात विजेचा खांबावरील तार तुटून अचानक चरण्यासाठी जात असलेल्या ५ बकऱ्यांवर पडली. यांत गौतम तायडे यांच्या मालकीच्या तीस हजार किमतीच्या तीन, युवराज तायडे यांच्या मालकीची सात हजार किमतीची १ तर संतोष तायडे यांच्या मालकीची सात हजार किमतीची एक अशी अदांजे ४४ हजार रुपयाच्या बकऱ्या मृत्यूमुखी पडल्याने गोंधळ उडाला.
महावितरणच्या गलथान कारभारानेच आमचे नुकसान झाल्याचा आरोप करत संबधितांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. महावितरणच्या कारभार विरोधात वातवरण तापल्याने सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि देविदास इंगोले पथकासह घटनास्थळी झाले. त्यांनी संबधितांची समजूत घातली.







