नाशिक ( प्रतिनिधी ) – पाच वर्षापासून केजीएस साखर कारखान्याकङे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रूपयांचे ऊसाचे पेमेंट थकले आहे.आता कारखाना दुसर्या कंपनीला विकण्यात आल्याची माहिती समजली असून आमची थकबाकी मिळाल्या शिवायआम्ही केजीएस साखर कारखाना सुरू करू देणार नाही. असा इशारा शिंगवे (निफाङ) येथील शेतकऱ्यांच्या बैठकीत देण्यात आला.

सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक प्रभाकर रायते यांच्या नेतृत्वाखाली थकबाकीदार ऊस उत्पादकांचा लढा अधिक त्रीव्र करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
यावेळी शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या. अनेकदा कारखाना स्थळावर आंदोलने केली.कारखाना प्रशासनाने नेहमीच उङवाङवीची उत्तरे दिली.त्यानंतर शेतकऱ्यांनी साखर आयुक्त, जिल्हाधिकारी ,निफाङ तहसिलदार व संबधित प्रशासनाला निवेदने दिली उपोषणाचे इशारे दिले परंतू शेतकऱ्यांच्या निराशाच पदरी पङली.केजीएस च्या ऊसाच्या पेमेंटच्या भरवशावर अनेक घरात लग्न मोडली.काहींचे शिक्षणं थांबले.दोन तीन शेतकर्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.परंतू अद्यापही शेतकर्यांना पेमेंट मिळाले नाही.केजीएस साखर कारखाना गंगामाई उद्योग समूहाने विकत घेतल्याचे शेतकर्यांना समजल्यानंतर पेमेंट कसे मिळणार याची चिंता लागली.त्यानंतर शिंगवे येथील भूमिपुत्र सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक प्रभाकर रायते यांनी थकबाकीदार शेतकर्यांना एकत्र करत शिंगवे येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रभाकर रायते म्हणाले की, केजीएस थकबाकीदार शेतकर्यांचा एक पैसाही बुडवून देणार नाही. घामाचे दाम मिळालेच पाहिजे. केजीएस थकबाकीदार शेतकरी संघर्ष समितीची स्थापना करून लढा उभा केला जाईल.त्यासाठी थकबाकीदार शेतकऱ्यांनी एकजुटीने संघर्षांसाठी उभ राहण्याची गरज आहे.सध्या मुंबईत कराराची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.त्यामध्ये शेतकर्यांच्या थकबाकी संदर्भात नमुद केलं आहे की नाही.याबाबत संघर्ष समिती माहिती घेईल. त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवेल.








