जळगाव ( प्रतिनिधी ) – मोटार सायकल चोरी करुन त्या लोकांकडे गहाण ठेवणारे अट्टल मोटार सायकल चोर आरीफ तडवी व चेतन चव्हाण यांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत
वर्षा भरा पासून मोटार सायकलचोरीचे सत्र सुरुच असल्याने मोटार सायकल चोरी करणार आरोपीचा शोध सुरु होता पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे , .अपर पो. अधीक्षक चंद्रकांत गवळी व रमेश चोपडे यांनी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले व स्थानिक गुन्हे शाखा यांना तपासाचे आदेश दिले होते. तपासासाठी सहाय्यक फौजदार अशोक महाजन , रवि नरवाडे , पो.हे.कॉ महेश महाजन , पो.ना किशोर राठोड , पो.ना रणजित जाधव , श्रीकृष्ण देशमुख , पो.कॉ विनोद पाटील , उमेशगीरी गोसावी , ईश्वर पाटील , पो.कॉ हेमंत पाटील , दिपक चौधरी , मुरलीधर बारी , अशोक पाटील यांचे पथक नेमलेले होते

पो नि किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या गुप्त बातमी मिळाली की, आरीफ शरिफ तडवी (वय 24 रा.गणेश नगर पहूर ) हा मोटार सायकल चोरी करतो त्यास ताब्यात घेवुन पुढील कारवाई करा असे त्यांनी पथकास आदेश दिले. पथकास तो जामनेर पहूर रोडवर मोटारसायकल ह मिळून आला चौकशी केल्यावर त्याने व चेतन चव्हाण (वय 23 रा.लोहारा ता.पाचोरा )ने मिळून मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली.
या दोघांना अटक करून त्यांचेकडून 5,15,000 /- रुपये किमतीच्या 19 मोटार सायकल जप्त करण्यात आल्या या आरोपींविरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात ८ , जळगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यात ३ , जामनेर पोलीस ठाण्यात २ , पिपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात २ , पहुर पोलीस ठाण्यात १ असे १६ गुन्हे यापूर्वी दाखल करण्यात आले आहेत.







