यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील चिंचोली येथील आयुषी बडगुजर मास्टर ऑफ इलेक्ट्रीकल या उच्च शिक्षणासाठी कॅलिफोर्नियाला रवाना झाली आहे.

आयुषी बडगुजर सिंहगड काॅलेज (पुणे ) येथे इलेक्ट्रॉनिक्समधुन बी.ई.पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षन आता San Jose state university California या विद्यापीठात घेणार आहे. आयुषी हिने कॅलिफोर्निया येथिल उच्च शिक्षणासाठी विद्यापीठात Masters in electrical engineering – Specialization in networking हा विषयाची निवड केली आहे.
कु.आयुषी ही चोपडा येथिल राजेन्द्र बडगुजर व सौ.अनिता बडगुजर यांची कन्या तर चिंचोली येथील रहिवासी व सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत असलेले अनिल बडगुजर व सौ.वंदना बडगुजर यांच्या होणा-या स्नुषा आहेत. आयुषी बडगुजर ही नुकतीच कॅलिफोर्निया येथे उच्च शिक्षणासाठी रवाना झाल्या बद्दल तीचे जिल्ह्यातील बडगुजर समाज बांधवांनी व अभिषेक बडगुजर; चिंचोली येथील लोकमान्य पिक सोसायटीचे व्हाईस चेअरमन मधुकर बडगुजर; सदाशिव बडगुजर; नितिन बडगुजर; शुभम बडगुजर; श्रीराम बडगुजर; जळगाव येथिल विवेक बडगुजर; कुणाल बडगुजर; सुहास बडगुजर ; अंकुश बडगुजर; संजय बडगुजर आदींनी अभिनंदन केले आहे.







