जामनेर ( प्रतिनिधी ) – आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला आज ४ लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला .

तोंडापुर येथील शेख मुशीर शेख जहीर हा इसम काही दिवसापुर्वी झालेल्या नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्याची घटना घडली होती . शासनाच्या आपत्ती पुरग्रस्त योजना मदत निधी अंतर्गत या मयत इसमाच्या कुटुंबाला ४ लाख रुपयांचा धनादेश आमदार महाजन यांच्या निवासस्थानी देण्यात आला .
यावेळी जे के चव्हाण , रामेश्वर पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते .







