जामनेर ( प्रतिनिधी ) – अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती (जामनेर)च्या वतीने शहर व परिसरातील अवैध धंदे बंद करण्याबाबत आज पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
जामनेर शहरात व परिसरात अवैध धंदे सुरू आहेत. जामनेर बाजारपेठ परिसरात सट्टा- जुगार सर्रास चालू आहे.भुसावळ रोड परिसरात, मुख्य रस्ता तसेच चक्क महिला शौचालयाच्या बाजूला अवैध गावठी दारूचा उत आला आहे.यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येत असल्याचे निदर्शनास येते.स्थानिक पोलीस प्रशासनाने अवैध धंद्यांना आळा घालावा व अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असे निवेदन अखिल भारतीय भ्रष्टचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आले.
यावेळी संघटनेचे जामनेर तालुकाध्यक्ष गजानन तायडे, उप – तालुकाध्यक्ष विनोद सोमवंशी ,शहराध्यक्ष अविनाश सपकाळे, तालुका मुख्य संघटक मोहन पाटील, तालुका संघटक अतुल मेढे तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







