जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यात वाढलेल्या शस्त्र तस्करी आणि गुन्हेगारीच्या पार्श्वभूमिवर पोलिसांनी ‘मास्टर प्लॅन’ आखला असून गुन्हेगारांचे मॅपींग करून त्यांच्यावर मोक्का, एमपीडीए, हद्दपारी आदींसारखी कारवाई करण्यात येणार आहे . जिल्ह्यातील अवैध शस्त्रांचा उगमच संपवणार व ३ महिन्यात गुन्हेगारांना सरळ करणार असल्याचे आश्वासन पोलीस महानिरीक्षकांनी आज दिले.
पत्रपरिषदेत नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक बी.जी. शेखर पुढे म्हणाले की , यासाठी पोलिस आता अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांमधील गेल्या ५ वर्षातील गुन्हेगारांचा डेटा एकत्र करीत आहेत ते गुन्हेगार सध्या काय करीत आहेत. त्यांना जामीन मिळाला आहे का ? यावर पोलिसांचे लक्ष आहे. आता प्रत्येक पोलीस ठाण्यात दत्तक गुन्हेगार योजना राबवली जाणार आहे. प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांकडे २ गुन्हेगार तपासणीसाठी सोपवले जाणार आहेत. वैयक्तिक दुशमनीच्या पार्श्वभूमीवर असे गुन्हे घडतात असे लक्षात आले आहे. हे योग्य नाहीच पोलीस कमी पडलेले नाहीत. कारण वैयक्तिक दुशमनीचे सर्व वाद पोलिसांपर्यंत येतातच असे नाही. पालकांनीही आपल्या तरुण मुलांवर लक्ष ठेवायला हवे, म्हणून आम्ही कम्युनिटी पोलिसिंग उपक्रम राबवणार आहोत अवैध सावकारी रोखण्यासाठी पोलीस वचनबद्ध आहेत अशा सावकारीग्रस्तांनी पोलिसांपुढे यावे आम्ही कटावरी करू असेही ते म्हणाले.







