जळगाव ( प्रतिनिधी ) — तालुक्यातील पाथरी ग्रामपंचायत कार्यालयाजवळील डेअरीतील साहित्य अज्ञात व्यक्तीने पेटवून देवून ५१ हजार रूपयांचे नुकसान केल्याचे २२ सप्टेंबररोजी सकाळी उघडकीला आले अज्ञात व्यक्तीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाथरी गावातील ग्रामपंचायत कार्यालयजवळ पाथरी सहकारी दूध उत्पादक सोसायटी आहे. २२ सप्टेंबररोजीच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने डेअरीच्या दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत डेअरीतील अनालाईझर मशीन इन्व्हर्टर बॅटरी, प्रिंटर, स्टेशनरी असा एकूण ५१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जाळून टाकून नुकसान केल्याची घटना २२ सप्टेंबररोजी उघडकीला आली. डेअरीचे सचिव शशिकांत बाविस्कर (वय-४६) यांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून शशिकांत बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो उ नि क अनिश शेख करीत आहे.







